Skip to main content

गुल पनागने लपवली आई झाल्याची बातमी! सहा महिन्यांपूर्वीचं दिला मुलाला जन्म!!

 गुलचे गोंडस बाळ आता सहा महिन्यांचे झाले आहे. निहाल असे त्याचे नामकरण करण्यात आलेय. निहालबदद्ल मीडियाला कळले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. अखेर गुल पनागने बाळाच्या जन्माची बातमी का लपवून ठेवावी ?




Gul Panag welcomed a baby boy six months ago | गुल पनागने लपवली आई झाल्याची बातमी! सहा महिन्यांपूर्वीचं दिला मुलाला जन्म!!

गुल पनागने लपवली आई झाल्याची बातमी! सहा महिन्यांपूर्वीचं दिला मुलाला जन्म!!
अभिनेत्री गुल पनाग आई झाली. पण काल-आज नाही तर सहा महिन्यांपूर्वी. होय, गुल पनागने सहा महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण आत्तापर्यंत तिने ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली. गुलचे गोंडस बाळ आता 
सहा महिन्यांचे झाले आहे. निहाल असे त्याचे नामकरण करण्यात आलेय. निहालबदद्ल मीडियाला कळले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. अखेर गुल पनागने बाळाच्या जन्माची बातमी का लपवून ठेवावी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. अलीकडे मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत गुलने यामागच्या कारणाचा खुलासा केला.
 ‘ मी आणि ऋषी (गुलचा पती) आम्ही दोघांनीही कायम आपले खासगीपण जपण्याचाचं प्रयत्न केला आहे. आई-वडिल बनने हा आमच्यासाठी एक खास अनुभव होता आणि आम्हाला हा अनुभव रसरसून उपभोगायचा होता. त्यामुळे कुणाला कळू न देता, या अनुभवातून जायचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला. आमच्या कुटुंबीयांना आणि काही जवळच्या मित्रांना निहालबद्दल माहितीये. पण यांना वगळता आम्ही निहालच्या जन्माचा फार गवगवा केला नाही. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर यासंदर्भात बोलणे आम्ही टाळले. आता निहाल सहा महिन्यांचा झाला आहे. मी मातृत्वाचा आनंद घेतेय. निहालच्या जन्मानंतर रात्रीची झोप कमी झालीय, पण मी खूप आनंदी आहे. त्याच्यासोबत प्रत्येक क्षण मी जगतेय. या प्रत्येक क्षणाची एक आठवण मी मनात जपून ठेवलीय, असे गुलने सांगितले. निहालच्या जन्मानंतर सहाचं महिन्यात गुल आपल्या ओरिजनल शेपमध्ये परतली आहे. हे तिने कसे साधले, याबद्दलही गुल बोलली. निहालचा जन्म वेळेपूर्वीच(prematurely) झाला. त्यामुळे माझे फार वजन तसेही वाढले नव्हतेच. प्रेग्नंसीदरम्यान मी पोषक आहार घेतला. या काळातही मी प्रचंड अ‍ॅक्टिव्ह होते. त्यामुळे निहालच्या जन्मानंतर मी सहज पूर्वीच्या शेपमध्ये परतले. काही किलो वाढलेले वजन मी लगेच कमी केले, असे ती म्हणाली. बाळाला जन्म देणे ही एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी घेण्यास तुम्ही तयार असाल तरच एक नवा जीव जन्मास घालण्याचा हक्क तुम्हाला आहे. लोक म्हणतात म्हणून नाही तर तुम्ही तयार आहात का, हे स्वत:ला विचारून याबाबतचा निर्णय घ्यायला हवा, असेही ती म्हणाली.

गुलने २०११ मध्ये ऋषीसोबत लग्न केले होते.


↣↣  AryaTechLoud YouTube Channels 

Comments